जयंतीदिवशी बाळासाहेबांची आठवण काढत शिवसेनेवर फडणवीसांनी डागले टीकेचे बाण

जयंतीदिवशी बाळासाहेबांची आठवण काढत शिवसेनेवर फडणवीसांनी डागले टीकेचे बाण

मुंबई : आज शिवसेना पक्षप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करून आदरांजली वाहिली आहे.

बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांकरिता अत्यंत स्फूर्ती देणारं, प्रेरणादाई व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे ज्याठिकाणी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव येईल त्याठिकाणी संघर्षाला उभे राहू, त्यांच्या बाजूने उभे राहू असं फडणवीस म्हणालेत. दरम्यान, बाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीसांनी आपल्या जुन्या मित्राला, म्हणजेच शिवसेनेला टोला हाणलाय. 

काय म्हणतात फडणवीस : 

"अलीकडच्या राजकारणात आपण पाहतो, खूप वेळा नेत्यांची मने छोटी छोटी होतात, ते आपल्या पलीकडे पाहू शकत नाही. पण बाळासाहेबांचं मन देखील राजासारखं होतं. जे चैतन्य बाळासाहेब तयार करायचे, ते मात्र फारच अप्रतिम असायचं. निवडणूक हरो किंवा जिंको, पण बाळासाहेब येऊन गेल्यावर जिंकल्याची खरी मजा यायची. ही बाळासाहेबांमध्ये  खऱ्या अर्थाने ताकद होती. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब  ठाकरे यांनी आपल्यामध्ये जे बीजारोपण केलं ते राष्ट्रीयत्वाचं बीजारोपण केलं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब  ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे. 'ते' कुठेही असले आणि 'आम्ही' कुठेही असलो तरीही आमच्याकरता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे निश्चितपणे आदरस्थानीच राहतील. ज्याठिकाणी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव येतील त्याठिकाणी संघर्षाला उभे राहू, त्यांच्या बाजूने उभे राहू.. त्यांच्या विचारांकरता उभे राहू. तुम्ही मिसळ केली असेल त्यांच्या विचारात. मात्र आम्ही केलेली नाही, असं फडणवीस म्हणालेत.

mumbai politica news devedra fadanavis pays tribute to late balasaheb thackeray and targets shivsena 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com