भाजपाला आणखी एक धक्का ! निवडणुकीआधीच भाजप नेत्याने शिवबंधन बांधून केला शिवसेनेत प्रवेश

सुमित बागुल
Wednesday, 27 January 2021

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षात अस्वस्थता असल्याचं जाणकार सांगतात.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. सर्व पक्षांकडून निवडुकीच्या तयारीला जोरात सुरवात देखील झालीये. अशात निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षांमधून इनकमिंग आणि आउट गोइंग देखील सुरु होतं. याचीच प्रचिती आता येताना पाहायला मिळतेय. भारतीय जनता पक्षाचे माजी सचिव समीर देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर हातावर शिवबंधन बांधुन शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. 

महत्त्वाची बातमी : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महत्त्वाची बैठक

कोण आहेत समीर देसाई ? 

  • समीर देसाई हे काँग्रेसचे माजी खासदार गुरूदास कामत यांचे भाचे आहेत 
  • समीर देसाई आधी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमधून निवडणूक लढवत ते नगरसेवक देखील झाले होते. 
  • कॉग्रेसला रामराम ठोकत समीर देसाई यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. 
  • समीर देसाई हे भारतीय जनता पक्षाचे माजी सचिवही राहिलेत. 

महत्त्वाची बातमी : "स्वतःचे दामन रक्ताने लादले असणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आरोप करूच नये"आशिष शेलार यांचे राऊत पवारांवर थेट आरोप

मुंबई महापालिकेच्या निवडणुका २०२२ मध्ये होणार आहेत. निवडणुकांच्या आधीच भाजपमधून आता शिवसेनेत इनकमिंग सुरु झालंय. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर समीर देसाई यांचा भारतीय जनता पक्षात होणारा प्रवेश हा अत्यंत महत्त्वाचा मनाला जातोय. समीर देसाई यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला बळकटी मिळेल असंही राजकीय विश्लेषक म्हणतायत. 

भाजप सोडण्याचं कारण काय ? 

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षात अस्वस्थता असल्याचं जाणकार सांगतात. अशात भारतीय जनता पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून समीर देसाई यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकलाय असं बोललं जातंय.

mumbai political news ex bjp secretory sameer desai joins Shivsena in the presence of uddhav thackeray

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai political news ex bjp secretory sameer desai joins Shivsena in the presence of uddhav thackeray