महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महत्त्वाची बैठक

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी नेमलेल्या उच्चाधिकार समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यामंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सीमाभाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ  तसेच एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. आज दुपारी दोन वाजता ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. 

कर्नाटकच्या बाजूने काही दिवसांपूर्वी सीमाभागात पिवळा झेंडा लावण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेकडून तिथे जाऊन भगवा झेंडा लावण्याची घोषणा केली गेलेली. यामुळे सीमाभागातील वातावरण चांगलंच तणावाचं झालं होतं. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत अंत्यंत महत्त्वाची बैठक पार पडतेय. स्वतः शरद पवार हे या बैठकीत उपस्थित असणार आहेत. सोबतच विरोधी पक्षांना देखील या बैठकीत बोलावलं  गेलं आहे. 

या बैठकीत कोण-कोणत्या बाबींवर चर्चा होते, नेमकी महाराष्ट्राची सीमाभागावर काय भूमिका असणार आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्राकडून कर्नाटकाशी कसा पत्रव्यवहार केला जाणार आहे यासाठी आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मनाली जातेय. दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे.

mumbai political news important meeting to discuss border tension between maharashtra and karnataka

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com