बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येणार एकत्र

अनिश पाटील
Saturday, 23 January 2021

उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे हे काही वर्षानंतर एकाच व्यासपिठावर येणार आहे.

मुंबई, ता.23: शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुर्णकृती पुतळ्याचे अनावरण आज शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थित राहाणार आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबईची हवा पडली 'आजारी'; कशामुळे होतेय मुंबईची हवा इतकी विषारी ?

दक्षिण मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा समोरील वाहतुक बेटावर हा नऊ फुटी ब्रॉंझचा पुतळा उभारण्यात आला आहे. यासाठी 1200 किलो ब्रॉन्झ धातू वापरण्यात आला आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमीत्त या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबईकरांनो सावधान ! तुम्ही पिताय ते दुध भेसळयुक्त तर नाही ना?

सर्व पक्षीय नेत्यांना यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही उपस्थीत राहाणार आहेत.

मुंबई आणि आसपासच्या परिसरातील सर्व बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे हे काही वर्षानंतर एकाच व्यासपिठावर येणार आहे.

mumbai political news uddhav thackeray raj thackeray sharad pawar and devendra fadanas to share diaz together 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai political news raj thackeray and uddhav thackeray to come together on on stage