
मुंबई : शहरात वायू प्रदुषणाबाबतच्या एका अहवालानुसार जानेवारी ते जून दरम्यान धुलीकणांमुळे प्रदूषणाची सरासरी पातळी राष्ट्रीय मानकांपेक्षा खाली असल्याचे म्हटले आहे. पण मुंबईतील देवनार, सायन, कांदिवली पूर्व तसेच बीकेसी परिसरात ही पातळी धोकादायक मर्यादेपेक्षा जास्त नोंदवली गेली आहे. त्यामुळे मुंबईवरील धुळीचे वादळ आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.