

Mumbai Pollutiuon
ESakal
मुंबई : मुंबईतील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत; मात्र सध्या हवेचा वेग मंदावल्याने वाहनांतून बाहेर पडणारा धूर आणि धूळ जमिनीलगतच साचून राहत आहे. त्यामुळे मुंबईत प्रदूषणाची तीव्रता अधिक जाणवत आहे. नियंत्रणासाठी बांधकामांच्या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासह नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.