मुंबई : गरिबीमुळे आत्महत्या वाढल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : गरिबीमुळे आत्महत्या वाढल्या

मुंबई : कोरोना काळात म्हणजे मार्च 2020 च्या नंतर महाराष्ट्रात 10 पैकी 6 आत्महत्या या गरिबीमुळे झाल्याची नोंद राष्ट्रीय गुन्हे नोंद अहवालात (नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो रिपोर्ट) करण्यात आली आहे. यात भर म्हणजे या आत्महत्या आधीच्या वर्षापेक्षा 5 टक्क्यांनी वाढल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाने सर्वस्व हिरावून गेल्या नंतर हवालदिल झालेले नागरिक मात्र आत्महत्या करत असल्याचे चित्र या नोंदीतून समोर येत आहे.

दरम्यान, 2020 या वर्षात एकूण 19 हजार 909 मृत्यूंपैकी 65 टक्के म्हणजे 12 हजार 969 आत्महत्या करणाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न फक्त 1 लाख होते असल्याची माहिती अपघाती आणि आत्महत्येच्या नोंदी अहवालातून मिळत आहे. मात्र, त्याच वेळी अपघाती मृत्यू आणि आत्महत्येच्या नोंदी ठेवणार्या विभागाकडून ही देखील माहिती देण्यात आली की, विशेषत:

1 ते 5 लाख, 5 ते 10 लाख तसेच 10 ते अधिक अशा वार्षिक उत्पन्न असलेल्या गटातील कुटुंबियांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले. राज्यात 2019 यावर्षात 1 ते 5 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबिय गटातील आत्महत्येचे प्रमाण 6 हजार 660 वरुन 6 हजार 331 एवढे घटले होते. तर 5 ते 10 लाख उत्पन्न असलेल्या गटातील 672 वरुन 562 एवढे घटले होते. 10 लाख हून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबियांतील 63 वरुन 47 एवढ्या आत्महत्या कमी झाल्या होत्या.  

हेही वाचा: Pune | कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका दिवाळीनंतर

दरम्यान कोरोना काळात बहुतांश आत्महत्यांमागे गरिबीच असल्याचे सार्वजनिक रुग्णालयातील डॉक्टर सांगतात. 2020 या वर्षात देशभरात 11.3 टक्क्यांनी म्हणजेच 2019 या वर्षात 1.4 लाख तर 2020 या वर्षात 1.5 लाख आत्महत्या वाढल्या असल्याचे सांगण्यात आले.

शहरांतील आत्महत्या दर हा 14.8 टक्के एवढा असून हा देशपातळीवरील आत्महत्या दर 11.3 टक्क्यांहून अधिक आहे. आत्महत्येमागील सर्वाधिक मोठे कारण गरीबी असल्याचे वारंवार समोर आले आहे.

हेही वाचा: नवीन मिळकतींमुळे दोनशे कोटींचे उत्पन्न

एनसीआरबी 2020 अहवालात 2020 वर्षात पसरलेल्या कोरोना महामारीतील मानसिक आरोग्य स्थिती या वाढलेल्या आत्महत्यांमधून स्पष्ट होत आहे.

. डॉ. हरिष शेट्टी, मानसोपचार तज्ज्ञ, राज्य कोरोना कृती समिती दल.

Web Title: Mumbai Poverty Has Led To An Increase In Suicides

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai
go to top