मुंबई 'ब्लॅकआऊट'मागे चिनी सायबर हल्ल्याचा संशय ; गृहमंत्र्यांनी घेतली पत्रकार परिषद, केला महत्त्वाचा खुलासा

मुंबई 'ब्लॅकआऊट'मागे चिनी सायबर हल्ल्याचा संशय ; गृहमंत्र्यांनी घेतली पत्रकार परिषद, केला महत्त्वाचा खुलासा

मुंबई :  गेल्या १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोठा इलेक्ट्रिक फेल्युअर झालेला मुंबईकरांना अनुभवायला मिळाला होता. या इलेक्ट्रिक फेल्युअरनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबई अंधारात गेलेली देशाने पहिली. दरम्यान, त्यामध्ये चीनचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिली होती. मुंबईत झालेल्या इलेक्ट्रिक फेल्युअरमुळे मुंबईची लाईफ लाईन  लोकल ट्रेन, स्टॉक मार्केट आणि मुंबईकरांचं  जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेलं होतं.

यानंतर MSEB ने याबाबत अधिक तपासाची मागणी केली होती.  यामध्ये कोणता बाह्य शक्तींचा हात आहे का? याबाबत चौकशी करावी अशी मागणी ऊर्जा विभागाकडून करण्यात आलेली. यानंतर आज 'न्यू-यॉर्क' टाइम्समध्ये त्याचाच उल्लेख करत एक लेख प्रकाशित केलेला आहे. सोबतच 'वॉल स्ट्रीट जर्नल'मध्ये देखील अशीच शक्यता वर्तवली गेली आहे. 

ऊर्जा विभागाच्या मागणीनंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांमार्फत महत्त्वाची चौकशी करण्यात आली. सायबर पोलिसांनी 'SCADA' मध्ये ऍनालिसिस केल्यानंतर काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढलेले आहेत.

आज महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. गृहमंत्र्यांनी  'न्यू यॉर्क टाइम्समध्ये आलेल्या बातमीच्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद घेतली होती. सोबतच महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केलेल्या तपासाचा अधिकृत रिपोर्टदेखील अनिल देशमुख यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सुपूर्त केला आहे.   

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तयार केलेल्या अहवालात कोणत्या बाबी? 

मुंबईच्या इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मालवेअर घुसवल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय या अहवालात नमूद केला गेला आहे. त्यासोबतच या रिपोर्टमधील तीन महत्त्वाच्या बाबी मांडण्यात आलेल्या आहेत. 

  1. इलेक्ट्रिक फेल्युअर घडवण्यासाठी १४ ट्रोजन हॉर्सेस या सर्व्हिसमध्ये टाकण्यात आल्याचे काही पुरावे समोर आले आहेत
  2. या अहवालात 8 GB डेटा ट्रान्स्फर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे
  3. ब्लॅकलिस्टेड म्हणजेच काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या इंटरनेट प्रोटोकॉल आयडी म्हणजेच IP वरून लॉगिन झाल्याचीही शक्यता या अहवालात वर्तवली गेलेली आहे 

दरम्यान, आजच्या ज्या लेखाचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हवाला दिला त्या 'न्यू यॉर्क' टाइम्सच्या रिपोर्टमध्ये काय छापून आलंय, तेही जाणून घेऊयात. 

  1. न्यू यॉर्क टाइम्समध्ये म्हंटले आहे की, मुंबईतील ब्लॅकआऊटच्या मागे चीनचा हात असण्याची शक्यता आहे. सायबर हल्ला करवून ब्लॅकआऊट करवण्यात चीनचा प्रयत्न असल्याची शक्यता
  2. भारतातील पॉवरग्रीड फेल करण्याचा चीनचा प्रयत्न होता तसेच मुंबईसह संपूर्ण देश चीनला अंधारात टाकायचा होता
  3. चिनी मालवेअर्सनी भारतातील वीज पुरवठा करणाऱ्या कंट्रोल सिस्टीममध्ये घुसखोरी केली होती. 
  4. यामाध्यमातून हाय व्होल्टेज ट्रान्समिशन, सब स्टेशन आणि थर्मल पॉवरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता 
  5. अमेरिकन सायबर फर्म रेकॉर्डेड फ्युचरकडून या चिनी सायबर हल्ल्याबाबत खुलासा करण्यात आलेला आहे, असं आजच्या न्यू यॉर्क टाईमध्ये म्हंटलं आहे.
  6. यामधील काही मालवेअर ऍक्टिव्ह न झाल्याने मोठा अनर्थ टळला होता. भारतातील मोठ्या प्रमाणात पॉवर ग्रीड कंट्रोल करण्याचा चीनचा प्रयत्न होता.  

Mumbai power outage chinas cyberattack on India could have led power failure anil deshmukh

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com