
निर्बंध हटवल्यामुळे प्रवाश्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
लसीकरण झाले असो किंवा नाही, प्रत्येकाला लोकल प्रवास करता येणार
राज्य सरकारकडून कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आल्यानंतर मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध (Covid Restrictions) हटवले आहेत. यासंदर्भात रेल्वेने प्रवाशांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. लसीकरणाशी संबंधित असणारा पर्याय रेल्वे तिकीट अॅपमधून हटवला आहे. कोरोना नियमांमुळे आतापर्यंत फक्त पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी होती. मात्र निर्बंध हटवल्यामुळे प्रवाश्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
हेही वाचा: जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितावर गोळीबार; शोधकार्य सुरु
यामुळे आता लस प्रमाणपत्रे तिकीट अॅपशी लिंक करण्याची आवश्यकता भासणार नाही. राज्य सरकारच्या आदेशानंतर आता रेल्वेनेही सर्व निर्बंध उठवले आहेत. मुंबईतील रेल्वेसाठी काउंटरवर आणि अॅपवर सर्वांसाठी तिकीट सुविधा सुरू केली आहे. याचा अर्थ प्रवाशांना आता त्यांची लस प्रमाणपत्रे तिकीट अॅपशी लिंक करण्याची आवश्यकता नाही. यासंबंधित सर्व सूचना आता मागे घेण्यात आल्या आहेत, असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोना निर्बंध 1 एप्रिलपासून हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई उपनगरीय गाड्यांवरील दैनंदिन प्रवासी संख्या जवळपास 65 लाखांवर पोहोचली आहे. मध्य रेल्वेवर सुमारे 35 लाख आणि पश्चिम रेल्वेवर 29 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. महामारीच्या आधी असलेल्या प्रवाश्यांची ही आकडेवारी 15 लाख कमी आहे. रेल्वेच्या तिकिटावर अशा निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागला. तसेच रेल्वेलाही त्यांच्या महसुलात जवळपास 1000 कोटींचा तोटा झाला आहे आणि या सगळ्याचा बोजा पुढील अर्थसंकल्पात प्रवाशांवर नक्कीच पडेल असे अंदाजही वर्तवले जातं आहेत.
हेही वाचा: भारतात सर्वाधिक मृत्यू आत्महत्येमुळे, बिहारमधील परिस्थिती मात्र उलट
Web Title: Mumbai Public Wants To Travel In Local Train Without Covid19 Vaccination
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..