

Mumbai-Pune Expressway Traffic
ESakal
लोणावळा : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांची संख्या तसेच सलग सुट्ट्यांमुळे शनिवारी सकाळपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली. मिसिंग लिंकनंतर प्रथमच इतकी कोंडी झाली. खालापूर टोलनाका परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या. इतर प्रवाशांनाही कोंडीचा सामना करावा लागला.