Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Missing Link Accident

Missing Link Accident

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक'च्या बोगद्यात भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका फॉर्च्युनर कारने मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातामुळे मिसिंग लिंकवरील वाहतूक काही तास ठप्प झाली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com