मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुकर; 20 नव्या शिवनेरी दाखल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

शिवनेरी बसेसच्या तिकीट दरात भरघोस कपात करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता मुंबई-पुणे महामार्गावर नवीन 20 शिवनेरी बसेस सुरु करण्याचा संकल्प केला आहे.

मुंबई : शिवनेरी बसेसच्या तिकीट दरात भरघोस कपात करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता मुंबई-पुणे महामार्गावर नवीन 20 शिवनेरी बसेस सुरु करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी 8 बसेस मुंबई-पुणे मार्गावर आजपासून (शुक्रवार) सुरु करण्यात आल्या आहेत.

मुंबई-पुणे मार्गावर दिवसभरात 272 फेऱ्या सुरु असून, त्यामध्ये आजपासून सुरु झालेल्या 32 फेऱ्यांची वाढ झालेली आहे. यामुळे दादर-पुणे, दादर-स्वारगेट, बोरिवली-स्वारगेट, ठाणे-स्वारगेट अशा विविध मार्गावर आजपासून 304 फेऱ्या दररोज चालणार आहे. त्याचा फायदा असंख्य प्रवाशांना होणार आहे. 

दरम्यान, मागील महिनाभरात तिकीट दरात कपात केल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत एका महिन्यात सुमारे 21 हजार प्रवाशांची वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Mumbai Pune New 20 Shivneri Buses involved in MSRTC