Mumbai Pune Railway Close : मुंबई-पुणे रेल्वे १५ तासांहून अधिक काळ ठप्प; सेवा केव्हा सुरू होणार?

लोणावळा-कर्जत घाटात दरडींचा तडाखा; १७ गाड्या रद्द, ३१ वळविल्या; ८० हून अधिक कर्मचारी आणि ८ जेसीबींच्या सहाय्याने युद्धपातळीवर दुरुस्ती.
Mumbai Pune Railway CLose

Mumbai Pune Railway CLose

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई–पुणे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली आहे. लोणावळा- कर्जत घाट विभागातील ठाकूरवाडी आणि मंकी हिलदरम्यान मध्यरात्री सुमारे २.३० वाजता दोन ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या. त्यानंतर पहाटे ३ वाजल्यापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, सेवा १५ तासांहून अधिक काळ ठप्प आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com