
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर लवकरच वॉटर टॅक्सी सेवा प्रवाशांसाठी खुली होणार आहे. दक्षिण मुंबईतून विमानतळापर्यंत जलमार्ग जोडणीसाठी रेडिओ क्लब जेट्टी प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. सध्या या प्रकल्पाचे सुमारे २४ टक्के काम पूर्ण झाले आहे. मे २०२६ पर्यंत संपूर्ण जेट्टी आणि टर्मिनल सुविधा कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.