मुंबई : तिकीट तपासणीसाला मारहाण करणाऱ्या महिलांना अटक | Mumbai Railway crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 women arrested

मुंबई : तिकीट तपासणीसाला मारहाण करणाऱ्या महिलांना अटक

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेवरील (central railway) नाहूर रेल्वे स्थानकात (Nahur Railway station) कर्तव्यावर असलेल्या तिकीट तपासनीसाला (Ticket checker) प्रवाशांनी मारहाण (commuters beating incident) करण्याची घटना घडली होती. यासंदर्भातला व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात महिला प्रवाशांकडून तिकीट तपासणीसाला मारहाण केली जात होती. या प्रकरणाचा आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी (railway police) शोध घेऊन मारहाण करणाऱ्या तीन महिलांना अटक (three women arrested) करण्यात आली आहे.

हेही वाचा: मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा धोका वाढला ; 7 दिवसांत रुग्ण संख्या दुप्पट

राज्य सरकारच्या निर्देशानुसार लसवंतांना लोकल प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यानुसार लसवंतांना रेल्वे परिसरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार नाहूर रेल्वे स्थानकावर तिकीट तपासनीस संदीप चितळे यांच्याद्वारे कर्तव्य बजावले जात होते. यावेळी चितळे एका प्रवाशाचे तिकीट तपासत होते. त्याच्याकडे तिकीट नसल्याने पावती फाडण्यात येत होती. यावेळी हे दृश्य पाहून एक अज्ञात प्रवासी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पळता-पळता तो प्रवासी 3-4 पायऱ्यांवरून पडला. तिकीट तपासनीसाला पाहून प्रवासी पडला असे समजून काही महिला प्रवाशांनी अचानक चितळे यांना घेराव घालून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने संबंधित महिलांविरोधात तक्रार दाखल केली. मुलुंड आरपीएफ आणि कुर्ला रेल्वे पोलीस यांनी तपास घेऊन तीन महिलांना अटक केली आहे. यात खडवली येथील आरोपी शुभांगी त्रिभुने, दिवा येथील आरोपी वैष्णवी काजवे, मुंब्रा येथील आरोपी रुक्सना शेख यांना पकडण्यात आले. या सर्व महिला नाहूर येथे हाऊस किपिंग, स्वच्छता विभागात काम करत आहेत, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

loading image
go to top