
Railway accident leads to new underground safety route proposal
esakal
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर रूळ ओलांडण्यामुळे दरवर्षी शेकडो प्रवाशांचे प्राण जातात. या धोकादायक समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) आता पादचारी पूल किंवा स्कायवॉकऐवजी भुयारी रेल्वे मार्ग (सबवे) बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. दोन स्थानकांच्या मधल्या अतिक्रमणप्रवण भागात सबवे उभारला जाणार असून, जमिनीखाली सुमारे चार मीटर खोलीवरून नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे.