Mumbai Railway Police : निर्भया फंडातून रेल्वे पोलिसांना निधीच मिळत नाही; नीलम गोऱ्हेंची खंत

यासोबत रेल्वे प्रवासादरम्यान जखमी झालेल्या किंवा अतिप्रसंगाला बळी पडलेल्या महिलांना वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदत कशी उपलब्ध होईल यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावे,
Railway-Police
Railway-Policesakal

Mumbai Railway Police - मुंबई उपनगरीय लोकलसह रेल्वेमधील महिलाविरोधी गुन्हे रोखण्यासाठी रेल्वे आणि स्थानिक पोलिसांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. धावत्या रेल्वेत महिलांवर अतिप्रसंग करणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने घटनास्थळी पकडण्याच्या दृष्टीने रेल्वे पोलिसांनी उपाययोजना कराव्यात असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिले.

यासोबत रेल्वे प्रवासादरम्यान जखमी झालेल्या किंवा अतिप्रसंगाला बळी पडलेल्या महिलांना वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदत कशी उपलब्ध होईल यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावे, अशा सूचना गोऱ्हे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.

मुंबई उपनगरीय लोकल सेवेत अलिकडे महिला अत्याचाराच्या काही घटना समोर आल्या. या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांची सुरक्षा आणि त्यावर रेल्वे प्रशासनाच्या उपापयोजना या सर्वांचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षेतेखाली विधीमंडळात एक महत्वाची बैठक झाली.

या बैठकीत अनेक मुद्यावर चर्चा झाली. बैठकीला गृहविभाग आणि रेल्वेचे वरीष्ठ पोलिस अधिकारी तसेच दक्षता समितीच्या सदस्य उपस्थित होते.

Railway-Police
Pune Crime News: पुणे पोलिसांनी लढवली शक्कल, कोंढव्यात आरोपीची काढली धिंड

बेकायदेशीर प्रवासी

रेल्वे घडणाऱ्या अनेक गुन्हांमध्ये विशेषता महिलांची छेडछाड करणारे गुन्हेगार हे बेकायदेशीरपणे रेल्वे आवारात प्रवेश करतात. रेल्वे ट्रॅकवरुन ते काही भागातून ते स्टेशनमध्ये शिरतात. गर्दुले, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा यात समावेश असतो.

सिएसएमटी- मशीद स्टेशनदरम्यान महिलेविरुध्द अतिप्रसंग करणारा आरोपी बेकायदेशीर प्रवास करत होत्याचे आढळून आले आहे.

तिकिटाशिवाय स्टेशनवर भटकणाऱ्या या प्रवाशांना अटकाव घातल्यास रेल्वेमधील महिला विरुध्द गुन्हे कमी होईल असं रेल्वे आयुक्त प्रज्ञा सरवदे यांनी सांगीतले. या शिवाय सदर गुन्हेगार प्रवेशमार्गिकेवरच्या सिसिटीव्ही यंत्रणाच्या रेकॉर्डवर हे येतील असे त्यांचे म्हणणे होते.

रेल्वेच्या उपाययोजना

यासाठी रेल्वे पोलिस सिसिटीव्ही यंत्रणा तसेच फेस रिडींग अद्यावत कॅमेरे बसवण्याचे काम सुरु असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. याशिवाय या सर्व स्थानकाभोवती सुरक्षा भिंत बांधण्याचे नियोजन रेल्वेचे आहे.

महिला प्रवाशांच्या डब्यात सिसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु आहे, यासोबत टॉक बॅक यंत्रणेसोबत इतर अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याचे रेल्वेच्या नियोजनासंदर्भातील माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ऋुषी शुक्ला यांनी दिली. या शिवाय टोल फ्री नंबरवर आलेल्या महिला तक्रारींचा तातडीने निपटारा होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Railway-Police
Mumbai : कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची चाळण; दक्षता विभाग शोधणार खड्ड्यांची कारणे...

दक्षता समितीसोबत समन्वय

रेल्वेत महिला सुरक्षेच्या मोहीमेत दक्षता समितीच्या सदस्यांना सामावून घेण्याच्या सूचना निलम गोऱ्हे यांनी दिल्या.या सदस्यांचा रेल्वे प्रवाशांशी जनसंपर्क असतो.

त्यामुळे प्रत्येक रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये सदस्यांची नावे व फोन नंबर दर्शनी भागात लावल्यास संकटकाळात महिला प्रवासी तातडीने या महिलांसोबत संपर्क साधू शकतील. रेल्वे पोलिस आणि दक्षता समिती सदस्यांच्या एकत्रित व्हाट्स एप ग्रूप तयार केल्यास अनेक घटनांची माहितीचे आदान प्रदान तातडीने होऊ शकेल असेही गोऱ्हे यांनी सांगीतले.

निलम गोऱ्हे यांच्या सूचना

१. महिला प्रवाशांच्या सुरक्षितेकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देणे

२. बेकायदेशीर प्रवाशांवर तात्काळ कारवाई

३. अपघात किंवा छेडछाड झालेल्या पिडीतेचे पुनर्वसन आणि वैद्यकीय मदत

४. महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे पोलिसांचा समन्वय

५. टोल फ्री क्रमांकावरच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करा

६. स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकीन्स उपलब्ध करून देणे

७. माता व बालकांसाठी रेस्ट रुमची व्यवस्था

Railway-Police
Mumbai News : मुंबईत निवासी जागांच्या किमतीत वाढ! दोन वर्षांत १४ टक्क्यांनी वाढ

रेल्वे पोलिसांच्या अडचणी

१. निर्भया फंडातून रेल्वे पोलिसांना निधी मिळत नाही

२. अपुरे मनुष्यबळ, मागणी करुन मिळाले नाही

३. प्रशिक्षित होमगार्डची अपुरी संख्या

४. नव्या रेल्वे पोलिस स्टेशनचा प्रस्ताव प्रलंबित

५. सर्वच ठिकाणे सिसिटीव्हीने कव्हर नाही.

वरीष्ठ अधिकारी उपस्थित

या बैठकीला गृविभागाचे प्रधानसचिव अनुपकुमार सिंह, रेल्वेचे पोलीस महासंचालक डॉ.प्रज्ञा सरवदे, रेल्वे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, मुंबई मध्य रेल्वेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ऋुषी शुक्ला ,मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील, पश्चिम रेल्वेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे, यासह महिला दक्षता समितीच्या सदस्या रेणुका साळुंखे,अरुणा हळदणकर,लीला पाटोडे,आशा गायकवाड,प्रतिका वायंदडे उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com