मुंबई : पश्चिम रेल्वेवरील (Western railway) वांद्रे टर्मिनस (bandra terminus) येथील शेडमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial intelligence camera) आधारित लोको निरीक्षण (loco inspection) प्रणाली स्थापित केली आहे. या प्रणालीमुळे लोकोच्या दोन्ही बाजू, छत आणि लोकोच्या खालील भागाचे निरीक्षण करणे सोयीस्कर झाले आहे. तसेच एक्सेल बॉक्सचे तापमान मोजणे, सैल आणि लटकणाऱ्या वस्तूची किंवा भागाची माहिती घेणे, चाकांची माहिती घेणे या प्रणालीमुळे सोपे झाले आहे.
पश्चिम रेल्वेमधील सर्व यंत्रणा डिजिटलाझेशन करण्यावर भर दिला जातो. यातूनच मुंबईच्या पश्चिम रेल्वेद्वारे वांद्रे टर्मिनस येथील शेडमध्ये एक आर्टिफशियल इंटेलिजेंस आधारित लोको निरीक्षण प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली कार्यक्षमता वाढविण्यासह देखभाल, देखरेखीच्या कामामध्ये पश्चिम रेल्वेसाठी साहाय्य बनणार आहे. नुकताच वांद्रे टर्मिनस येथे ही प्रणाली सुरू केली आहे. याद्वारे लोकोच्या दोन्ही बाजू, किनारी बाजू, छत आणि खालील बाजूचे निरीक्षण करणे शक्य होणार आहे. यासह चाकाची माहिती, कार्बन स्ट्रिपमधील उणिवा, छतावर तुटलेली इंसुलेटर, कैटल गार्डमध्ये काही त्रुटी याची माहिती तत्काळ या प्रणालीद्वारे मिळणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
या प्रणालीसाठी 3 डी कॅमेरा, 2 डी कॅमेरा, एलआयडीएआर, थर्मल कॅमेरा, एज प्रोसेसर, एक्सेस प्वाइंट, स्लाइडिंग आर्म्स इत्यादी अत्याधुनिक सामग्रीचा वापर केला आहे. सामान्यतः कर्मचाऱ्यांद्वारे लोकोचे निरक्षण करण्यासाठी 3 तास लागतात. मात्र, या प्रणालीचा निरीक्षणाचा वेग 1 मीटर प्रति मिनिट आहे. त्यामुळे या प्रणालीमुळे निरीक्षणासाठी 20 मिनिटे लागतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.