
मुंबई : काल सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारच्या सुमारास मुंबईसह उपनगर जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. अवघ्या चार तासांच्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र थोड्या वेळात पावसाचा जोर ओसरल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. अशातच हवामान खात्याने आज पुन्हा गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.