
Mumbai Rain update: मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावासमुळे रेल्वे वाहतूक तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाण झाला आहे. एवढंच नाही तर अनेक बैठ्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे. काहींच्या घरामध्ये गुडघ्याएवढं पाणी साचलं आहे. एकूणच मुंबई आणि उपनगरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून येतंय. सुदैवाने मुंबई आणि उपनगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती.