मुंबईकरांसाठी काळरात्र; पावसामुळे 25 जणांचा मृत्यू

मुंबईकरांसाठी काळरात्र; पावसामुळे 25 जणांचा मृत्यू

शनिवारी मध्यारात्री मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. रात्रभर झालेल्या पावसामुळे सकल भागात पाणी साचले, अनेक भागांत तर तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबईतील रस्त्यांना नद्या-नाल्यांचं स्वरुप प्राप्त झालं होतं. अनेक ठिकाणी तर घरांमध्येही पाणी शिरलं होतं. अनेक मुंबईकरांसाठी शनिवार रात्र काळरात्र ठरली आहे. मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळून मुंबईमध्ये तीन घटनांमध्ये दुर्देवी 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चेंबूरमध्ये 17, विक्रोळीमध्ये सात आणि भांडूपमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि अग्निशामन दलाकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे. जखमींना जवळील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेप्रति दु:ख व्यक्त केलं आहे. मृताच्या कुटुंबीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी दोन-दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर दुखापतग्रस्तांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

चेंबूरमधील डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या भारतनगरमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. संततधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली अन् भिंत घरावर कोसळल्यामुळे ही दुर्वेवी घटना घडली आहे. एनडीआरफ पथक घटनास्थळी दाखल असून बचावकार्य वेगानं सुरु आहे. आत्तापर्यंत सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून अजून काही नागरिक मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मृताच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईकरांसाठी काळरात्र; पावसामुळे 25 जणांचा मृत्यू
द्राक्षे आंबट होऊ देऊ नका; अमोल कोल्हेंना शिवसेनाचा इशारा

विक्रोळीमध्ये घडलेल्या दुसऱ्या एका घटनेमध्ये दुमजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली असून अजून कुणी मलब्याखाली दबलं आहे का? याचा शोध घेतला जात आहे. भांडुपमध्ये संरक्षक भिंत कोसळून एका 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सोहम थोरात असं या मुलाचं नाव आहे. भांडुपच्या अमरकोट भागामध्ये वनविभागाची भिंत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली.

PM मोदी काय म्हणाले?

या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना प्रकट करत आहे. जखमी झालेल्या व्यक्तिंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा ही प्रार्थना करतो.

अमित शाह यांनीही दु:ख व्यक्त केलं.

दुरघटनेबाबत ऐकून स्तब्ध झालो आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या परिजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना संकटातून सावरण्याची शक्ती देवो.

राष्टपती कोविंद यांनीही व्यक्त केलं दु:ख

मुंबईत पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाल्याची बातमीनं दु:ख झालं. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाप्रति मी सहवेदना व्यक्त करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com