मुंबईत २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : येत्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत आज (मंगळवार) पावसाने थैमान घातले आहे.
मुंबई आणि उपनगरात एका तासात ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी आठपासून मुंबईत १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कुलाबा वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.

बृहन्मुंबई महापालिकेचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी शहरांतील रस्त्यांवर कार्यरत आहेत. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मुंबई आणि उपनगरात पाणी साचण्याच्या ठिकाणी १३६ पंप कार्यरत आहेत आणि पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
सध्या मुंबई आणि उपनगरामध्ये हिंदमाता, शीव मार्ग क्रमांक २४ आणि अंधेरी सबवे या ठिकाणी पाणी साचल्याने बेस्टची वाहतूक वळविण्यात आली आहे.