
महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळी आयएमडीने मुंबईसाठी इशारा जारी केला. आयएमडीनुसार, पुढील ३-४ तासांत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि ५०-६० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माहीममधील इमारतीचा भाग कोसळला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.