Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत 8 जणांना मृत्यू; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

Mumbai rain storm: आतापर्यंत होर्डिंगखालून ५१ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. अनेकजण अद्याप सांगाड्याखाली अडकल्याची भीती आहे.
Ghatkopar accident
Ghatkopar accident

मुंबई- घाटकोपर पूर्व येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग पडल्याची दुर्घटना घडली आहे. यात आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मोहम्मद अक्रम , दिनेशकुमार जयस्वाल, चंद्रमणी प्रजापती असं मृतांचे नाव आहे. तिघे रीक्षाचालक असल्याचं कळतंय.

आतापर्यंत होर्डिंगखालून ५१ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. अनेकजण अद्याप सांगाड्याखाली अडकल्याची भीती आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ५७ जखमींवर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

तीन रिक्षाचालकांचा मृत्यू

या दुर्घटनेत पेट्रोल पंपावर गॅस भरण्यासाठी आलेल्या तीन रिक्षाचालकांच्या रिक्षावर लोखंडी कमान कोसळल्याने या तिघांचा यात मृत्यू झालं आहे. राजावाडी रुग्णालयात आता पर्यंत 57 जखमींना उपचारासाठी आणण्यात आले आहे. तर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ghatkopar accident
Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

आज मुंबईत देखील दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि प्रचंड वेगाने सुटलेल्या वादळाने महाकाय होर्डिंग लोकांच्या जीवावर उठली. घाटकोपर पूर्वेकडील रेल्वे पोलीस वसाहतीतील पेट्रोल पंपावर बाजूची लोखंडी जाहिरात होल्डिंग कोसळून मोठा अपघात झाला. ही कमान प्रचंड मोठी असल्याने ती संपूर्ण पेट्रोल पंपावर कोसळली. त्यात जवळपास दीडशे ते दोनशे लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेतील जखमींना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न बाजूला उभ्या असलेल्या एका रिक्षाचालकाने आणि नागरिकांनी केला. तर ही माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले. मात्र ही कमान संपूर्ण पेट्रोल पंपावर कोसळल्याने आणि काही प्रमाणात इंधन गळती, गॅस गळती सुरू असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. तरीही आज रात्री उशिरापर्यंत बचावकार्य आणि कमानीचा प्रचंड मोठा सांगाडा कटरने कापण्याचे काम सुरूच आहे.

Ghatkopar accident
Mumbai Rain Accident: घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले, जवळपास 80 गाड्या दबल्या, अनेकजण अडकल्याची भीती

वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे या पेट्रोलपंपावर अनेक दुचाकीस्वारांनी आसरा घेतला होता. काही चार चाकी वाहने आणि दुचाकीही आधीच पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी उभी होती. काही क्षणात जोराचा पाऊस आणि वादळी वारे वाहू लागले. त्यामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावर आसरा घेतला होता. मात्र डोक्यावर पेट्रोल पंपाचे छत असल्याने बाजूची ही महाकाय जाहिरात कमान कोसळताना लक्षात न आल्याने काही क्षणात ती थेट पेट्रोलपंपाच्या छतावर कोसळली. त्या दुर्घटनेत या ठिकाणी थांबलेले दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहन चालक अडकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com