Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath shinde at Ghatkopar hoarding accident: घाटकोपर पूर्व येथे महाकाय होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे
Ghatkopar cm shinde
Ghatkopar cm shinde

मुंबई- घाटकोपर पूर्व येथे महाकाय होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येक पाच लाख रुपयांची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

घाटकोपर अपघातात जखमी झालेल्या लोकांवर राजावाडी येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. आतापर्यंत ३५ लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. होर्डिंग पडल्याप्रकरणी जे दोषी आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असं शिंदे म्हणाले. तसेच शहरातील सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Ghatkopar cm shinde
Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत 3 जणांना मृत्यू; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यात दोषी असणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. आज दुपारपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसेच वादळ देखील आले. सोसाटाच्या वाऱ्यामुळे हे होर्डिंग पडल्याचं सांगितलं जातं. होर्डिंग थेट पेट्रोल पंपावरच जाऊन पडलं. त्यामुळे पावसापासून बचावासाठी पेट्रोल पंपाखाली आश्रय घेतलेल्या लोकांवर काळाने घाला घातला असं म्हणावं लागेल.

पेट्रोलपंप आणि जाहिरात हॉल्डींग नियमबाह्य

ही पेट्रोल पंपाची जागा रेल्वे पोलिसांची असून, या ठिकाणी पूर्वीच्या 6 जुन्या पोलिसांच्या इमारती होत्या. त्यातील 2 इमारती तोडून हा पेट्रोलपंप बांधला आहे. एकीकडे पोलिसाना घरे नसताना त्यांच्या जागेवर पेट्रोलपंप आणि जाहिरात होर्डिंग बेकायदेशीरपणे बांधले आहेत. याबाबतही कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. मात्र ती गोपनीयतेच्या कारणास्तव देता येत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी मदतकार्य करणारे रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी या विषयावर आंदोलन करणार असल्याचं इशारा यावेळी बोलताना दिला आहे.

Ghatkopar cm shinde
Mumbai Rain Accident: घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले, जवळपास 80 गाड्या दबल्या, अनेकजण अडकल्याची भीती

पेट्रोल पंपाच्या शेडमुळे दिलासा

ही जाहिरात कमान पेट्रोलपंपावर कोसळली त्यावेळी पंपावरील शेड होते. त्यावर कोसळल्याने पेट्रोल अथवा डिझेल टाकी आणि गॅस टँक शाबूत राहिले. त्यामुळे तातडीची दुर्घटना टळली अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र तरीही काही प्रमाणात पेट्रोल आणि गॅस गळती सुरू असल्याने पोलीस नागरिकांना घटनास्थळापासून हटवत होते.

एन डी आर एफ टीम दाखल

या दुर्घटनेत अनेक अडकलेल्या जखमींना बाहेर काढता येत नव्हते. यासाठी स्थानिक पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत होते. मात्र त्यांना यश येत नव्हते. त्यामुळे या ठिकाणी काहीं तासांत एन डी आर एफ टीमचे जवान दाखल झाले. त्यांनी ही घटना पेट्रोल पंपावर असल्याने गॅस कटर ऐवजी साध्या इलेक्ट्रिक कटरने वरील आच्छादन आणि बाजूचे लोखंडी रॉड कापण्याचे काम सुरू केले.

एकूण ८ मृतांपैकी ४ जण राजावाडी रुग्णालयात आहेत

१) भारत राठोड

२) चंद्रमनी प्रजापती

३) मोहम्मद अक्रम

४) दिनेश कुमार जैस्वाल

दुर्घटनेत 55 जण जखमी

रोहित वाकडे (वय २३)

गणेश पंचारम २०

असगर अली ३६

सय्यद शेख २८

गेन मिश्रा २९

दिलनात प्रजापती ४०

अजय धेलर २६

शकील खान ३

अजय वाल्मिकी ४०

ओम १८

फरहान खान २५

शहनवज खान १८

गिरीश सावंत ३५

राकेश गुरुल ५८

संदीप कुमार २५

चंद्रकांत सोनवणे ४९

पव्वल मुळे ३२

शरद जाधव ५२

सचिन भालेराव ४०

वहिदा खान २१

आशिष तिवारी २१

शुभम गावंडे १६

रशीद खान २८

वैभव पुलांकर २३

बालाजी भनोडे २९

विश्वास कारकर ३०

मनजीत पटवा ३२

सूरज तिवारी २५

प्रवीण निखोडे ३३

हर्षद कोकाटे २८

जमाल खान २४

शकील खान ४०

संदीप चव्हाण २५

अपूर्वा सावंत ४७

गौरव २७

खान ३०

संगीता संखरिया ५१

सुशील संखरिया ६०

कीर्ती 23

धीरज चौबे 21

कालीप्रसाद तिवारी 39

अरविंद शर्मा 30

राजू सोनवणे 52

विष्णू राय 39

गोविंद सरोज 25

बाबू 40

मुकेश मनडोल 28

नसीम खान 26

मोहम्मद अरशाद 30

गुप्ता 40

दयानंद 40

शाहरुख 19

झाईरा हुसेन 54

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com