Mumbai Rain : मुंबईत सकाळी 6:30 वाजल्यापासून पावसाचा जोर, काही भागांत साचले पाणी; वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
Mumbai Rain Today : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, पुढील काही तास मुंबईत सतत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
मुंबई : आज (सोमवार) सकाळी ६:३० वाजल्यापासून संपूर्ण मुंबई शहराला आणि उपनगरांना पावसाच्या सरींनी (Mumbai Rain) वेढले आहे. वातावरण पूर्णतः ढगाळ असून काही भागांत सतत पडणाऱ्या मध्यम ते जोरदार पावसामुळे नागरिकांची सकाळ थोडीशी गडबडीत सुरू झाली.