
राज्यातील अनेक शहरांमध्ये शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्याचबरोबर मुंबईची लाईफलाईन म्हणवल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनची अवस्थाही वाईट आहे. मुसळधार पावसात लोकल ट्रेनच्या छताला गळती लागली. छतातून टपकणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी प्रवाशांना डोक्यावर पॉलिथीन बांधून आणि छत्र्या उघड्या ठेवून प्रवास करावा लागला आहे.