
Mumbai Local Train Update: मुंबईत पावसाने कहर केला असून अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. रेल्वेमार्गांवरही पाणी साचल्याने हार्बर लाईनवर लोकसेवा विस्कळीत झाली आहे.अनेक लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मस्जिद बंदर स्थानकावर पाणी साचल्यामुळे वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यान अप आणि डाउन हार्बर लाईन सेवा काही काळा साठी स्थगित करण्यात आली. तर कुर्ला रेल्वे स्थानकात पाणी साचले असून सेंट्रल लाईनवरील लोकल सेवा स्थगित करण्यात आली आहे. प्रवाशांची रेल्वे स्थानकांत मोठी गर्दी झाली आहे.