Mumbai Rain: मुंबईकर सुखावले! मुंबई ठाण्यात पावसाची हजेरी

पूजा विचारे
Monday, 7 September 2020

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत आज पहाटेपासून विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटानं पावसाला सुरुवात झाली आहे. अखेर या पावसानं मुंबईकर चांगलेच सुखावले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले होते.

मुंबईः मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत आज पहाटेपासून विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटानं पावसाला सुरुवात झाली आहे. अखेर या पावसानं मुंबईकर चांगलेच सुखावले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले होते. त्यामुळे सकाळपासून सुरु असलेल्या पावसाचा मुंबईकर आनंद घेताहेत. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून सगळीकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे काही दिवस मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील तापमानातही वाढ झाली होती. आज पहाटे चारच्या दरम्यान सुरु झालेल्या पावसामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पाऊस सुरु झाल्याने हवेत गारवा पसरल्याने तापमानातील वाढ घटली आहे.

हेही वाचाः  लाखो खासगी नोकरदारांचे प्रचंड 'प्रवासहाल'; रेल्वेत प्रवेश देण्याची मागणी

६ ते ९ सप्टेंबर या काळात मुंबई, ठाण्यासोबतच नाशिक आणि जुन्नर परिसरातही मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड भागात रात्री मुसळधार पाऊस पडला. पुढील काही तास या भागात ढगाच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे. कोकण किनारपट्टी काही भागात ही पावसाचा जोर राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

अधिक वाचाः  कामाठीपुरा बंद करा! स्थानिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; संसर्ग वाढण्याची भीती

Mumbai Rain Update Heavy Rainfall in mumbai thane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Rain Update Heavy Rainfall in mumbai thane