
Summary
मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी.
अंधेरी-बोरिवलीत फक्त ३ तासांत ५० मिमी पेक्षा जास्त पाऊस, रस्त्यांवर पाणी साचले.
कल्याणमध्ये भूस्खलन, तर राजकीय स्तरावर बीएमसीच्या कामकाजावर आरोप-प्रत्यारोप.
मुंबईसह रात्रभर मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने परिस्थिती बिकट आहे तर मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन अर्धा तास उशिराने धावत आहेत. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये १९ ऑगस्टसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षाच्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.