मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातीचं संकट टळणार?, १० दिवसांत निर्णय

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे.
water supply
water supply sakal
Summary

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे.

मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे. मुंबईत जेव्हापासून १० टक्के पाणी कपात जाहीर झाली आहे, त्यानंतर तलाव क्षेत्रातही पाण्याच्या पातळीत सुधारणा व्हायला पावसामुळे मदत झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या तलाव क्षेत्रातील पावसामुळे तीन टक्क्यांनी पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे असाच पाऊस पडत राहिला तर आगामी आठ ते दहा दिवसात पाणी कपात रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येऊ शकतो अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. 

मुंबईत संपूर्ण जून महिना पावसाविना गेला. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलावांनी तळ गाठला. त्यामुळे मुंबई महापालिकेला १० टक्के पाणी कपात करावी लागली आहे. मागील चार - पाच दिवसांपासून तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसत असल्याने तलावांत पाणीसाठा वाढतो आहे. गेल्या ५ दिवसात ३.२ टक्के म्हणजेच ४६,३०४ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे तलावात १२ दिवसाचा पाणीसाठा वाढला आहे. तलावक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मोडकसागर, तानसा, मध्यवैतरणा, भातसा, विहार, तुलसी, अप्पर वैतरणा या सातही तलावांतून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे तलावात पुरेसा पाणीसाठा जमा होत होता. मात्र यंदा संपूर्ण जून महिना पावसाविना गेला. त्यामुळे तलावांत पाण्याचा साठा कमी झाल्याने पाण्याचे संकट ओढवले. ही बाब लक्षात घेऊन पालिकेला मुंबईकरांचे १० टक्के पाणी कपात करावे लागले. जून अखेरीला पावसाने दमदार हजेरी लावली. तलावांतही मागील चार - पाच दिवसांपासून समाधानकारक पाऊस लागतो आहे. २९ जूनला धरणामध्ये १ लाख ४७ हजार ६ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.१६ टक्के पाणीसाठा होता.

मुंबईला ५० दिवसा पुरेल इतका पाणीसाठा

गेल्या ५ दिवसात पाऊस पडल्याने १ लाख ९३ हजार ३१० दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या ५ दिवसात ३.२ टक्के म्हणजेच ४६,३०४ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली आहे. गेल्या ५ दिवसात १२ दिवसांच्या पाण्याची वाढ झाली आहे. हा पाणीसाठा पुढील ५० दिवस पुरेल इतका आहे.

४ जुलैचा पाणीसाठा -

  • २०२२ मध्ये १९३३१० दशलक्ष लिटर - १३.३६ टक्के

  • २०२१ मध्ये २८५२५७ दशलक्ष लिटर - १९.७१ टक्के

  • २०२० मध्ये १०९००६ दशलक्ष लिटर - ७.५३ टक्के

धरणातील पाणीसाठा -

  • मोडक सागर ४७,८४१ - दशलक्ष लिटर

  • तानसा १,३५,५५८ - दशलक्ष लिटर

  • मध्य वैतरणा १९,९५६ - दशलक्ष लिटर

  • भातसा १,०३,०३१ - दशलक्ष लिटर

  • विहार ६,१२० - दशलक्ष लिटर

  • तुलसी २,८०३ - दशलक्ष लिटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com