
मुंबईत रात्रीच्या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून, आज अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अंधेरी ते घाटकोपर पट्ट्यात रात्री अवघ्या काही तासांत 200 मिमी पाऊस पडल्याने रेल्वेचे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. यामुळे कुर्ला परिसरातील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) जवळील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.