esakal | Mumbai Rains: डोंबिवली 'जलमय'! पाऊस नसूनही घरात शिरलं पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Rains: डोंबिवली 'जलमय'! पाऊस नसूनही घरात शिरलं पाणी

Mumbai Rains: डोंबिवली 'जलमय'! पाऊस नसूनही घरात शिरलं पाणी

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

तुम्हाला माहिती आहे यामागचं कारण....

डोंबिवली: गुरुवारी डोंबिवली परिसरात सकाळ पासून हलकासा पाऊस सुरू आहे. पाऊस जास्त नसतानाही पश्चिमेतील चाळ परिसरात सकाळी 7 वाजल्यापासून पाणी भरायला सुरवात झाली. दुपारी 12 च्या दरम्यान पाण्याची पातळी एकढी वाढली की शेवटी चाळीतील नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. पाऊस नसतानाही खाडीला भरती आल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. (Mumbai Rains Dombivli area waterlogging in houses due to Hide Tide)

गेल्या चार दिवसापासून ठाणे जिल्ह्यात मूसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी शहरी भागात पावसाचा जोर कमी होता, मात्र ग्रामीण भागात पावसाचा जोर जास्त असून पावसामुळे वालधूनी, उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे कल्याण, डोंबिवली खाडीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सकाळी पाऊस जास्त नसल्याने घरात पाणी येणार नाही याचं विचाराने नागरिक गाफील राहिले होते. परंतु सकाळी 7 पासून खाडीचे पाणी परिसरात घुसण्यास सुरवात झाली. 10 च्या दरम्यान खाडी लगत घरे असणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्यास सुरवात केली. 12 च्या दरम्यान कंबरे पेक्षा जास्त पाणी आल्याने अखेर चाळीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी होडीचा सहारा घ्यावा लागला.

हेही वाचा: स्वप्निलच्या कुटुंबीयांवरील 19.96 लाखांचं कर्ज भाजपने फेडलं!

डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा, देवीचा पाडा, कोपर, मोठा गाव, चिंचोळीचा पाडा, गरिबाचा वाडा, राजू नगर आदी परिसरातील चाळींत पाणी शिरले आहे. नागरिकांची घरातील महत्वाचे सामान वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. काहींची मुले पुढे गेली होती, ती मुले पाण्याच्या बाहेर आपले आई पप्पा कधी येतात हे पहात होते, प्रत्येक बोटीच्या फेरीकडे त्यांचे डोळे लागले होते. मनसेचे कार्यकर्ते या नागरिकांच्या मदतीला धावून गेले, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना पहिले बाहेर काढण्यास प्राधान्य देण्यात आले.

देवीचा पाडा परिसरात हजाराच्या आसपास नागरिक पाण्यात अडकले आहेत. होडीच्या सहाय्याने दुपारी 1 पर्यंत 200 हुन अधिक नागरिकांना बाहेर काढण्यात आले. या नागरिकांची अमोघसिद्ध हॉल व महापालिका 20 नं शाळा येथे राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. सायंकाळी भरतीचे पाणी ओसरल्यानंतर अंदाज घेऊन नागरिक परत घरी जातील अशी माहिती मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले.

हेही वाचा: "हवं तर हेलिकॉप्टर वापरा, पण सगळ्यांना सुखरूप बाहेर काढा"

तरुणाला चावला साप

खाडीचे पाणी परिसरात शिरल्याने जमिनीखालील साप, विंचू बाहेर आले. साचलेल्या पाण्यात साप इकडून तिकडे विहार करीत असल्याने नागरिकांना त्याचीही भीती वाटतं होती. एका तरुणाला फुरसा साप चावल्याने त्याला त्वरित पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.

loading image