esakal | Mumbai Rains: सर्व मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द -मध्य रेल्वे
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-Local-Train-In-Rain

Mumbai Rains: सर्व मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द -मध्य रेल्वे

sakal_logo
By
विराज भागवत

हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर घेण्यात आला होता मेगाब्लॉक

मुंबई : ट्रान्सहार्बर, हार्बर मार्गाची देखभाल व दुरुस्तीची (Railway Repairing Work) कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक (Mega block) घेण्यात येतो. तसाच मेगा ब्लॉक या रविवारी १८ जुलैलादेखील घेण्यात आला होता. ब्लॉकच्या कालावधीत ट्रान्सहार्बर मार्ग आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना (Travelers) सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मध्ये आणि पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Railway) प्रवास करण्याची परवानगी होती. तर, मात्र मुसळधार पावसामुळे आज असलेला मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने ट्वीटरवरून याबद्दलची माहिती दिली.

हेही वाचा: मुंबईकरांनो, जरा जपून... पावसाबद्दल हवामान खात्याकडून इशारा

विरार ते वसई रोड दरम्यान अप जलद मार्गावर रात्रकालीन ब्लाॅक होता. शनिवारी-रविवारी रात्री 11 ते रात्री 3 वाजेपर्यंत हा ब्लॉक होता. या ब्लाॅक कालावधीमध्ये विरार ते वसई रोड दरम्यान अप जलद मार्गावर ब्लाॅक घेण्यात आला. पण, रविवारी दिवसा हा ब्लाॅक संपलेला होता. मात्र, हार्बर मार्गावर सीएसएमटी चुनाभट्टी / वांद्रे डाऊन दरम्यान सकाळी 11.40 ते सांयकाळी 4.40 वाजेपर्यंत या वेळेत मेगाब्लॉक होता. ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन लोकल सेवा, सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा, सीएसएमटी ते वांद्रे / गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या होत्या. हा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी काळरात्र; पावसामुळे 25 जणांचा मृत्यू

तसेच, ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-वाशी / नेरूळ / पनवेल अप व डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान मेगाब्लॉक होता. ब्लाॅकदरम्यान ठाणे येथून वाशी / नेरूळ / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन सेवा आणि पनवेल / नेरूळ / वाशी येथून ठाणेसाठी सुटणाऱ्या अप सेवा ब्लाॅक कालावधी दरम्यान रद्द करण्यात आल्या होत्या. पण या मार्गावरील गाड्याही आता दिवसभर सुरू असणार आहेत.

loading image