esakal | मुंबई, उपनगरांत पहाटेपासूनच पावसाला जोर; सखल भाग 'जलमय'
sakal

बोलून बातमी शोधा

rain

मुंबई, उपनगरांत पहाटेपासूनच पावसाला जोर; सखल भाग 'जलमय'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिवसभर मुंबईसह कोकणातही मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज

मुंबई: गेल्या तीन दिवसापासून बरसत असलेल्या पावसाने गुरूवारी संध्याकाळनंतर काहीशी उसंत घेतली होती. पण त्यानंतर शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने पुन्हा जोर धरला. मुंबई आणि उपनगरे तसेच आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची सुरवात झाली असून पुढील तीन दिवस मुंबईसह कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Mumbai Rains heavy rainfall in suburban area Konkan thane Palghar Navi Mumbai Raigad)

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात फक्त १८ गर्भवती महिलांचे लसीकरण !

पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे पहिल्या तीन तासात शहर विभागात 36 मिमी, पुर्व उपनगरात 75 मिमी आणि पश्चिम उपनगरात 73 मिमी पावसाची नोंद झाली. सोमवार पासून मुंबईत पावसाची रिपरीप सुरु होती. मुंबई सह कोकणपट्ट्यातही पावसाळी ढगांची दाटी झाली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण पट्ट्यात पुढील तीन तास जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: "हे तर सुनेला पोळ्या जमत नसल्याने पीठ अंगावर ओतून घेण्यासारखं"

मुंबईत काही दिवस दडी मारलेल्या पावसाने आठवड्याच्या सुरूवातीला दणक्यात पुनरागमन केले. गेले दोन-तीन दिवस पावसाने सतत हजेरी लावली आहे. पावसाची रिपरिप मुंबईत दोन दिवस सुरु होती. बुधवारपर्यंत पाऊस जोरदार कोसळला. गुरूवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आणि मुंबईकर सुखावले. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पनवेल, वसई, पालघर आणि रायगड पट्ट्यातही पावसाने कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली होती. त्यानंतर शुक्रवारी पहाटेपासून सर्वत्र जोरदार पाऊस बरसू लागला. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले.

loading image