
गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावासनं आज मुंबईत पुन्हा जोर धरला आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसामुळे लोकलसेवेवरसुद्धा परिणाम झाला आहे. ऐन गणेशोत्सवातच मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. मुंबईसह राज्यात २९ ऑगस्टपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.