मुंबई महापालिकेवर न्यायालयाने ओढले ताशेरे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

मुंबई : नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही. परिणामी, मुंबई तुंबण्याच्या घटना वारंवार होत आहेत. यातून पालिका प्रशासन कोणताही धडा घेत नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. 

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे उडालेली मुंबईची दाणादाण आणि मुंबईकरांचे झालेले हाल याबाबत मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली. मुंबईला पावसाने झोडपण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत; मात्र त्यातून आपण एक इंचभरही पुढे गेलेलो नाही, अशा शेरा न्यायालयाने पालिकेच्या कारभारावर मारला.

सामाजिक कार्यकर्ते अटल बिहारी दुबे यांनी उपनगरामध्ये डॉप्लर रडार बसविण्याच्या मागणीसाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयात सुनावणी झाली आहे. उपनगरामध्ये रडार बसविण्यासाठी पालिकेने मंजुरी दिली आहे; मात्र अद्याप त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही केलेली नाही, अशी माहिती याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. एस. के. नायडू यांनी खंडपीठाला दिली. गोरेगावमध्ये पालिकेने जागा मंजूर केली आहे; मात्र त्याच्या शुल्काबाबत चर्चा सुरू आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. याचिकेवर पुढील सुनावणी गुरुवारी (ता. 7) आहे. 

Web Title: mumbai rains mumbai monsoon marathi news mumbai weather Mumbai Municipal Corporation