मुंबईत विक्रमी पाऊस, सर्वात मोठ्या पावसाचा रेकॉर्ड मोडणार...

समीर सुर्वे
Wednesday, 5 August 2020

आज मुंबईत तुफान पाऊस बारसतोय. आजच्या पावसाने  ऑगस्ट महिन्यातील  आतापर्यंतच्या मोठ्या पावसाचे रेकॉर्ड मोडलेत

मुंबई  : आज मुंबईत तुफान पाऊस बारसतोय. आजच्या पावसाने  ऑगस्ट महिन्यातील आतापर्यंतच्या मोठ्या पावसाचे रेकॉर्ड मोडलेत. कुलाबा येथे 10 ऑगस्ट 1998 ला ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक 261.9 मिमी पाऊस नोंदवला गेला होता. तर आज केवळ 9 तासात कुलाबा येथे 229.6 मिमी पाऊस नोंदविण्यात आला असून 24 तासात हा पाऊस यापुर्वीचे सर्व विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

पाऊस सकाळी 8.30 वाजेपर्यंत 24 तासांमध्ये मोजला जातो. वर्ष 1974 पासूनचा ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पाऊस 1998 ला झाला होता. आज सकाळी 8.30 वाजेपासून संध्यकाळी 5.30 वाजेपर्यंत तब्बल तब्ब्ल 229.6 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.

मोठी बातमी - अतिवृष्टीचा एसटीलाही फटका; कोकणात जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द....

मुंबई महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापिकांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात फोर्ट परीसरात शहरातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. या परीसरात 325.89 मिमी पाऊस झाला आहे. तर कुलाबा पंपिंग येथे 301.74 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.

पावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे लोकल सेवा आणि वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून फोडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली आहे. याबाबतची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून निर्गमित करण्यात आली. 

 

सर्वात मोठी बातमी : मुंबई हाय अलर्टवर, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला तातडीचा आढावा
 

जेएनपीटी बंदरावरील तीन महाकाय क्रेन मोडून पडल्या.

गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने आज वादळी वाऱ्यासोबत नवी मुंबई-पनवेल परिसरात कोट्यवधी रूपयांचे नुकसान केले. उरणमधील जेएनपीटी बंदरावरील तीन महाकाय क्रेन मोडून पडल्या. ताशी 80 किलो मीटर वेगाने सुरु असलेल्या वाऱ्यामुळे नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडीयमवरील भव्य पत्रा त्याच्या सांगाड्यासोबत एखाद्या कागदासारखा अलगद उडून गेला. पत्र्याचे अवशेष शीव-पनवेल महामार्गावर न जाता स्टेडीयमच्या आवारातच पडल्यामुळे मोठी हानी टळली.  

( संकलन - सुमित बागुल )   

mumbai rains to set new record since 1998 maximum rain fall in last 24 hours 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai rains to set new record since 1998 maximum rain fall in last 24 hours