esakal | मुंबई जलमय, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Rain

मुंबईला शनिवारी रात्री पावसाने जोरदार झोडपले आहे. सकाळी चार वाजेपर्यंत पाऊस सुरुच होता. त्यामुळे सर्व रस्ते जलमय झाले आहेत, तर अनेक भागात पाणी साचले आहे. सध्या पावासाने विश्रांती घेतली आहे.

मुंबई जलमय, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Mumbai Rain मुंबईला शनिवारी रात्री पावसाने जोरदार झोडपले आहे. सकाळी चार वाजेपर्यंत पाऊस सुरुच होता. त्यामुळे सर्व रस्ते जलमय झाले आहेत, तर अनेक भागात पाणी साचले आहे. सध्या पावासाने विश्रांती घेतली आहे. तरी सर्वत्र पाणी साचले असल्याने नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यंत महत्त्वाचे काम असले तरच जोखीम पत्करुन बाहेर पडावं असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंयय.

मुंबईसह इतर ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वेचं वेळापञक कोलमंडलं.मध्य आणि हार्बर मार्गावर अनेक स्थानकांवर रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. ठाणे /कल्याण, कर्जत/ खोपोली, कसारा सेक्शन, वाशी / पनवेल, ट्रान्स हार्बर लाइन, नेरूळ/बेलापूर, खारकोपर लाइन वरील गाड्या कार्यरत, तर एक्सप्रेस गाड्याच्या वेळापञकात बदल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

अंधेरीच्या अंबोली पाठक परिसरात मुसळधार पावसाने बिल्डिंगची सुरक्षा भिंत गाडीवर कोसळली. आनंद धाम बिल्डिंगची ही सुरक्षा भिंत इसून राञी २:३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली.मुंबईतल्या हिंदमाता परिसरात राञी झालेल्या मुसळधार पावसात काही मिनिटात रस्ते जलमय झाले.

हेही वाचा: बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या कामाचा नारळ फुटणार कधी ?

मुंबईत काल राञीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत पुढील २४ तासात कोकण किनार पट्टीला अतिवृष्ठीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार ठाणे, रायगड, पालघर, मुंबई जिल्ह्य़ात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं वर्तवली आहे.

शनिवारी रात्रीपासून मुंबई, नवी मुंबई आणि लगतच्या भागांना पावसाने झोडपले असून मुंबईतील दादर, हिंदमाता, चिंचपोकळी परिसर जलमय झाला. मुंबईत मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस पडला. Mumbai Rains intense to very intense spells of rain warns imd

शनिवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, रात्री मुंबई आणि लगतच्या भागांना पावसाने अक्षरश: झोडपले. पावसामुळे हिंदमाता, दादर, चिंचपोकळी या भागात पाणी साचले. चिंचपोकळी येथे पावसाच्या पाण्यात दुचाकी वाहून जातानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भांडुप येथेही भंगार दुकानातील सामान पावसाच्या पाण्यात वाहून गेले.

“आयएमडी मुंबईने रात्री १२.३० वाजता जाहीर केलेल्या चेतावणीनुसार येत्या ३ तासात मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे”, अशी माहिती मुंबई महापालिकेने ट्विटरद्वारे दिली होती.

रविवारी मध्यरात्री पर्यंत संपुर्ण कोकण पट्टीच्या समुद्रात वाऱ्याचा वेग जास्त राहाणार असल्याने 3.5 ते 4.5 मिटरच्या लाटा उसळणार आहेत, असे वेधशाळेकडून जाहीर करण्यात आले आहे. तर, खबरदारीचा उपया म्हणून किनारपट्टी परीसरात सर्व यंत्रणा सज्ज असून नागरीकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.

loading image