
Raj Thackeray : जातीपातींच्या नावे राजकारण सर्वच पक्षांनी थांबवावे राज ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : आज महाराष्ट्राचे तरुण-तरुणी शिक्षणासाठी, नोकरीसाठी देशाबाहेर जात आहेत. कारण जातीपातीच्या नावे होणार्या राजकारणामुळे वातावरण प्रदूषित होत आहे. हे थांबवणे आवश्यक आहे असे माझे काँग्रेस, भाजप सर्वांना सांगणे आहे देशाच्या थोर पुरुषांची बदनामी करून आता काहीही होणार नाही. उलट प्रत्येक व्यक्तीला गुणदोषात सकट स्वीकारा, त्यातूनच महाराष्ट्राचे भाले होते का पहा, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे सांगितले.
पक्षाच्या मुंबई गट अध्यक्ष मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस खासदार राहुल गांधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींवर सडकून टीका केली.
शिवरायांबद्दल अनुचित उद्गार काढणारे भगतसिंग कोश्यारी हे राज्यपालपदी आहेत म्हणून त्यांचा मान ठेवतो, अन्यथा महाराष्ट्र शिव्यांची कमतरता नाही. सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी आहे का, माफी मागण्याची सावरकरांची स्ट्रॅटेजी (धोरण) होते. कृष्णानीती आपल्याला हेच सांगते. शिवरायांनी जयसिंहाला पुरंदरच्या तहात गडकिल्ले दिले त्यामागे हीच स्ट्रॅटेजी होती. ती समजत नाही तो गुळगुळीत मेंदूचा, अशा शब्दात त्यांनी सावरकरांवर टीका करणाऱ्यांवर कोरडे ओढले.आज जातीपातीच्या नावे वातावरण प्रदूषित होत आहे. स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची बदनामी करून आता काही होणार नाही. उलट तरुणांसाठी भविष्यात आदराची स्थाने काय असतील असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कोणाच्याही फक्त दोषांवर बोट ठेवू नका, त्याच्यात गुणही असतात ते स्वीकारा आणि त्यातून महाराष्ट्राचे भले होते का पहा, असेही राज ठाकरे म्हणाले.
ट्रकवर स्पीकर लावून हनुमान चालीसा म्हणा
आपण यापूर्वी समाज हितासाठी अनेक चांगली आंदोलने केली होती. नोकऱ्यांसाठीच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र तरुणांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या. मात्र आपली आंदोलन विस्मरणात टाकण्यासाठी सगळ्यांची धडपड असते. भोंगे अजूनही सुरू असून तुम्ही प्रथम त्याची पोलीस तक्रार करा. तरीही काही झालं नाही तर ट्रकवर मोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा म्हणा, तोपर्यंत हे वाटणीवर येणार नाहीत, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
उद्धव यांच्यावर टीका
आपली भूमिका पहिल्यापासून हिंदुत्वाची आहे, उलट मराठी आणि हिंदुत्वाच्या नावे उद्धव ठाकरेंवर एकही खटला नाही. कारण त्यांनी कधी भूमिकाच घेतली नाही. स्वार्थासाठी सर्वत्र जाणे हीच त्यांची भूमिका आहे, असाही टोला राज ठाकरेंनी उद्धव यांना लगावला.