
भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात देखभाल-दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षात तब्बल १०५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. माहिती अधिकाराअंतर्गत याची माहिती समोर आलीय. तर याच उद्यानात असलेल्या पेंग्विन्सवर पाच वर्षात २५ कोटी ८४ लाख इतका खर्च झाला आहे. महिन्याकाठी हा खर्च जवळपास ४० लाखांपेक्षा जास्त आहे.