मुंबईत रुग्ण दुपटीचा दरात दिवसेंदिवस वाढ, १४४ दिवसांवर पोहोचला दर

मिलिंद तांबे
Thursday, 29 October 2020

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत हा दर 144 दिवसांवर गेला आहे. तर 27 ऑक्टोबरपर्यंत एकूण 14,84,306  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.48 इतका आहे.

मुंबई: मुंबईत रुग्ण दुपटीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत हा दर 144 दिवसांवर गेला आहे. तर 27 ऑक्टोबरपर्यंत एकूण 14,84,306  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.48 इतका आहे.

मुंबईत बुधवारी 1,354 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,54,242 झाली आहे.  मुंबईत बुधवारी 31 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,153 वर पोहोचला आहे. मुंबईत काल 1,354 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,24,217 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत बुधवारी नोंद झालेल्या 31 मृत्यूंपैकी 26 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 17 पुरुष तर 14 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 31 रुग्णांपैकी 3 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 28 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबईत 616 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 7,532 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 6,212 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून काल कोविड केअर सेंटर 1 मध्ये 895 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अधिक वाचा- सुशांतच्या बहिणींविरोधात रियानं केलेले आरोप निव्वळ अंदाज- सीबीआय

मुंबईतील कोविडचे संक्रमण नियंत्रणात

मुंबईतील कोविडचे संक्रमण नियंत्रणात आलेला असला तरी मृत्यूदर चिंताजनक आहे. देशात सर्वाधिक मृत्यूदर मुंबईत 4 टक्के आहे. हा मृत्यूदर 1 टक्क्यापर्यंत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.

मुंबईतील चार प्रभागांमध्ये मृत्यूदर 5 टक्क्यांहून अधिक आहे. यात, बी सॅडहस्ट रोड प्रभागात मृत्यूदर 6.66 टक्के आहे. देशात सर्वाधिक मृत्यूदर पंजाब राज्यात 3.14 टक्के त्या खालोखाल महाराष्ट्रात 2.63  टक्के आणि गुजरात मध्ये 2.19 टक्के मृत्यूदर आहे. संपूर्ण देशाचा विचार केल्यास मृत्यूदर 1.50 टक्के आहे. जागतिक पातळीवर 2.67 टक्के आहे.

अधिक वाचा-  चक्कर आल्यावर चप्पल किंवा कांदा नाकाला लावण्याच्या प्रथेमुळे मेंदूच्या विकारांवर होत आहे दुर्लक्ष

मुंबईतील प्रत्येक प्रभागात कोविडचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 100 दिवसांपेक्षा जास्त आहे. रुग्णवाढीचा वेग 0.50 टक्के आहे. असे असले तरी मृत्यूदर हा देशात सर्वाधिक आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूदर 1 टक्क्यांवर आणण्याचे निर्देश दिले आहेत.

सप्टेंबर महिन्यांच्या तुलनेने मृत्यूदरात घट झाली आहे. मृत्यूदर अधिक कमी करण्यासाठी रुग्ण वेळीच शोधून त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी कोविड चाचणी केंद्र सुरु करण्यात आले असून चाचण्याची संख्याही वाढविण्यात आली असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

--------------------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai rate doubled day by day reaching 144 days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai rate doubled day by day reaching 144 days