मुंबईत घरांच्या किंमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; वाचा सविस्तर | Mumbai real estate update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

buildings in mumbai

मुंबईत घरांच्या किंमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; वाचा सविस्तर

sakal_logo
By
- तेजस वाघमारे

मुंबई : गृह प्रक्लप उभारण्यासाठी (Housing project) अत्यावश्यक असलेले सीमेंट, पोलाद, यासारख्या कच्च्या मालाच्या किमतींमध्ये (Raw Material prices) 10 ते 15 टक्क्यांनी वाढ (ten to fifteen percent increases) झाली आहे. सतत वाढणाऱ्या किमती वेळीच न रोखल्यास याचा भर विकासकांना ग्राहकांवर (consumer) टाकावा लागणार आहे. यामुळे घरांच्या किमतीही 10 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

हेही वाचा: कोविड महामारीचा मुलांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम; वाचा सविस्तर

कोरोना महामारीचा फटका गृहनिर्माण क्षेत्रास मोठ्या प्रमाणात फटका बसला. बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने प्रोत्साहनपर योजना जाहीर केल्या. मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याने घरांची विक्री वाढीला लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच घर विक्री विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. दसरा, दिवाळीमध्ये घर खरेदीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, त्या वेगास आता अचानक खंड पडण्याची वेळ आली आहे.

बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या सीमेंट, पोलादासारख्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये गेले काही महिने सतत वाढ होत आहे. यामुळे विकासकांसमोर अनेक आर्थिक अडचणी येऊ लागल्या आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढत गेल्या घरांच्या किमतीमध्येही 10 ते 15 टक्के वाढ होण्याची भीती विकासकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. संपूर्ण देशातील खासगी स्थावर मालमत्तेसंदर्भातील ‘कॉन्फडरेशन ऑफ रिअल डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीआरईडीएआय) संस्थेने कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींविषयी चिंता व्यक्त केली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत जानेवारी 2020 पासून सतत वाढ होत आहे.

त्यानंतर करोनाचा कहर, कामगारांची कमतरता आणि त्यानंतर कामगारांच्या मजुरी दरातील वाढ आदींमुळे बांधकाम खर्च वाढत गेल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. त्यामुळे, बांधकाम खर्च 10 ते 15 टक्के वाढ झाली असल्याचे म्हंटले आहे. सीआरईडीएआयचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोदिया यांनी कच्चा मालाच्या किमती कमी करण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. तसेच, कच्च्या मालाच्या दरांतील जीएसटी सुसूत्रीकरणासह विविध उपाय योजावेत असे मत मांडले.

loading image
go to top