
मुंबईत कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट
मुंबई : मुंबईमध्ये कोरोना (Mumbai Corona News) रूग्णांची संख्या झापाट्याने कमी होतानाचे सकारात्मक चित्र पाहण्यास मिळत असून, गेल्या 24 तासांत मुंबईमध्ये 960 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 11 जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय 24 तासांत 1,837 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 9,900 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत. (Mumbai Corona Latest Updates )
मुंबईत सोमवारी 960 नवे रुग्ण आढळले असून 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 623 इतकी झाली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. (Corona Active Cases In Mumbai)
हेही वाचा: IPL 2022 : लखनऊ संघाची 'गरूड' भरारी; लोगो झाला लॉन्च
दरम्यान, आज नोंद करण्यात आलेल्या एकूण रूग्णांपैकी 835 म्हणजेच 87 टक्के रूग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नसून 960 रूग्णांपैकी केवळ 106 रूग्णांनाच रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज मुंबईमध्ये 45, 618 इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 24 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यानचा कोरोना संसर्गाचा वेग हा 0.16 टक्के इतका नोंदविला गेला असून, कोरोना रूग्ण दुपट्ट होण्याचा दर 421 दिवसांवर गेला आहे. सध्या मुंबईमध्ये एकही कंटेन्मेंट झोन अस्तित्वात नसून केवळ 6 इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.
Web Title: Mumbai Reports 960 New Covid19 Cases 1837 Recoveries And 11 Deaths In The Last 24 Hours
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..