मुंबईत HMPVची एन्ट्री, ६ महिन्यांच्या चिमुकलीला लागण; रुग्णालयात उपचार सुरू

HMPV in Mumbai : कोरोनानंतर आता जगभरात एचएमपीव्ही व्हायरसची दहशत निर्माण झालीय. भारतातही एचएमपीव्हीचे रुग्ण आढळत असून महाराष्ट्रात नागपूरनंतर मुंबईत चिमुकलीला HMPVची लागण झाल्याचं समोर आलंय.
hmpv virus
hmpv virussakal
Updated on

भारतातील पहिला एचएमपीव्ही रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर देशातील इतर राज्यातही या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. कर्नाटकनंतर गुजरात आणि महाराष्ट्रातही एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात नागपूरनंतर आता मुंबईत रुग्ण सापडले आहेत. मुंबईत सहा महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्हीची लागण झालीय. तिला गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल केलं होतं. तिच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com