esakal | Mumbai : किरकोळ विक्री कोरोनापूर्वीप्रमाणे
sakal

बोलून बातमी शोधा

 किरकोळ विक्री

मुंबई : किरकोळ विक्री कोरोनापूर्वी प्रमाणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशातील किरकोळ व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांची कोरोनापूर्व काळात जेवढी विक्री होत होती, त्याच्या जवळपास विक्री या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झाल्याची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. रिटेल असोसिएशन ऑफ इंडिया या देशातील छोट्या व्यापाऱ्यांच्या संघटनेने आज ही आकडेवारी जाहीर केली. यानुसार कोरोनापूर्व काळात म्हणजे सप्टेंबर २०१९ मध्ये किरकोळ व्यापाऱ्यांची जेवढी विक्री होत होती, त्याच्या साधारण ९६ टक्के विक्री या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये झाली आहे.

सप्टेंबर २०२० मधील विक्रीच्या तुलनेत या सप्टेंबरच्या विक्रीमध्ये २६ टक्के वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याचा अर्थ परिस्थिती पूर्वपदावर येत असून ग्राहकांचा विश्वासही वाढत आहे. त्यामुळे देशाच्या सर्वच भागात ग्राहक मोठ्या प्रमाणावर आता खरेदीसाठी बाहेर पडले असल्याचे मानले जात आहे. ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अन्नधान्य- वाणसामान, हॉटेल उद्योग ही क्षेत्रे जवळपास कोरोनापूर्व काळातील विक्रीच्या बरोबरीला आली आहेत.

हेही वाचा: 'आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात'

त्यामुळे आता येत्या सणासुदीचे दिवस लक्षात घेता व्यवसायात जवळपास दुप्पट वाढ होईल, अशी अपेक्षा असल्याचे जाणकार सांगत आहेत. क्रीडाविषयक साहित्य, कपडे यांच्या विक्रीचा वेग हळूहळू वाढत आहे. जसजसे सण समारंभ साजरे करण्याचे प्रमाण पूर्वपदावर येईल तशी या वस्तूंची विक्री अजूनही वाढेल अशी चिन्हे आहेत.

वर्ष २०१९ च्या तुलनेत या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स तसेच ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री २८ टक्के वाढली. अन्नधान्य व वाण सामानाची विक्री २७ टक्के वाढली. रेस्टॉरंट व्यवसायातही १२ टक्के वाढ झाली असून क्रीडा साहित्याची विक्री एक टक्का वाढली आहे. ब्युटी पार्लर व्यवसाय प्रतीक्षेत सौंदर्यविषयक उपकरणे, ब्युटी पार्लर - सलून, पादत्राणे दागिने यांचा व्यवसाय अजूनही कोरोना पूर्वकाळाएवढा झाला नाही, पण आता कोरोनाची तिसरी लाट येणार नसेल तर दसरा, दिवाळी, वर्षअखेर या सणासुदीच्या काळात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असे रिटेल असोसिएशनचे सीईओ कुमार राजगोपाल यांनी सांगितले.

loading image
go to top