esakal | लॉकडाऊनचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम; मुलांसह पालकांची चिडचीड वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

chidchid

मजा-मस्ती नाही... मनमुराद खेळ नाही.. गावी जाणे नाही.. विविध शिबिरं नाही इतकेच काय तर शाळाही नाही..अशा काहीशा वातावरणात गेली दोन महिने मुले घराच्या चार भिंतीच्या आतच आपले बालपण व्यतीत करत आहेत.

लॉकडाऊनचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम; मुलांसह पालकांची चिडचीड वाढली

sakal_logo
By
मयुरी चव्हाण काकडे

कल्याण : मजा-मस्ती नाही... मनमुराद खेळ नाही.. गावी जाणे नाही.. विविध शिबिरं नाही इतकेच काय तर शाळाही नाही..अशा काहीशा वातावरणात गेली दोन महिने मुले घराच्या चार भिंतीच्या आतच आपले बालपण व्यतीत करत आहेत. मात्र आता या बंदीस्त बालपणामुळे सहनशक्ती संपून मुलांची चिडचिड विकोपाला गेली असून यामुळे पालकांचीही चिडचिड वाढली आहे. 

मोठी बातमी ः कोरोनापाठोपाठ लेप्टोच्या नियंत्रणासाठी पालिका सज्ज; 50 हजार उंदरांचा खात्मा

त्यामुळे आता कुटुंबातील मानसिक स्वास्थ्याबाबत सल्ला घेण्यासाठी मानसोपचातज्ञांचे फोन खणखणू लागले आहेत. एकंदरीतच वाढत्या लॉकडाऊनचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. लॉकडाऊन काळात कोणत्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसल्याने घरातील सर्वांचे लक्ष वेधून  घेण्यासाठी एखादी क्रिया करणे, जास्त राग व्यक्त करणे, एखाद्या गोष्टीचा जास्त हट्ट धरणे असे बदल घराघरातील लहान मुलांमध्ये झाले असून दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत आहे. मुलांमध्ये थेट निर्णय घेण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांची चिडचिड विकोपाला गेली असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. 

मोठी बातमी ः आता काय बोलणार! सायन हायवेवर सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

सध्या पालकही अधिकाधिक वेळ हा मोबाईलवर व्यतीत करतात व स्वतःची सोय म्हणून मुलांच्या हातातही मोबाईल देतात. मोबाईलच्या व्यसनाचाही मुलांच्या मानसिकेतवर गंभीर परिणाम होत असल्याने कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य स्थिर ठेवण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे प्रमाण गेल्या दोन महिन्यात सुमारे 30 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे भविष्यात मानसिक व्याधी दूर करण्याचे मोठे आवाहन आरोग्य यंत्रणेला पेलावे लागेल अशी भीती व्यक्त होत आहे. 

मोठी बातमी ः ...म्हणून मुंबई पोलिस स्टेशनमधील सॅनिटायझिंग स्प्रे मशीन हटवल्या

काय करावे ? 

  •  मुलांशी कायम संवाद ठेवावा. 
  •  मुलांना रहदारी नसताना थोडे वेळ बाहेर न्यावे. 
  •  एकच गोष्ट वारंवार मुलांना सांगू नये. 
  •  थोड्या मोठ्या मुलांना सद्यस्थितीबाबत प्रेमाने समजून सांगावे.
  •  वर्षाच्या आतील मुलांसोबत जास्त काळ आनंददायी क्रिया कराव्यात. 

मोठी बातमी ः मुंबईत या पाच स्थानकांहून टॅक्सी सेवा सुरु, अशी करा टॅक्सी बुक

पालकांनी आपली मतं मुलांवर लादू नयेत. त्यांचे स्वतः चे विचार आहेत. फक्त ते वेगेवगळ्या स्थितीतून जात असतात. थेट निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर कधी आलेली नसते. 
- डॉ. संदीप जाधव, मानसोपचारतज्ञ, कल्याण. 


आपला मुलगा असे का वागतो? अशी प्रतिक्रिया का देतो या बाबी संयम राखून पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. रहदारी कमी असली की सोसायटीच्या खाली, टेरेसवर, किंवा मोकळ्या ठिकाणी पाल्याला घेऊन जाण्यास हरकत नाही.
- डॉ. अद्वैत पाध्ये, मानसोपचारतज्ञ, डोंबिवली.

loading image
go to top