esakal | Mumbai : भाईंदरमध्ये रिक्षाप्रवास सुरक्षित!
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाप्रवास सुरक्षित

मुंबई : भाईंदरमध्ये रिक्षाप्रवास सुरक्षित!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाईंदर रिक्षा आणि रिक्षाचालक यांची संपूर्ण माहिती असलेले स्टिकर रिक्षाला बसविण्यात येत असल्याने भाईंदरमध्ये रिक्षाप्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. रिक्षातून एकट्या महिलेला आणि वयोवृद्ध व्यक्तींना सुरक्षित वाटावे, यासाठी भाईंदर पूर्वेतील नवघर पोलिस ठाण्याने हा उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे आणीबाणीच्या प्रसंगी महिला तसेच प्रवासी रिक्षाचालकाची माहिती पोलिसांना देऊ शकणार आहे.

नवघर पोलिसांनी सुमारे ५०० स्टिकर तयार केले आहेत. त्यात रिक्षामालक, चालक यांचा संपर्क क्रमांक, पत्ता, परवाना, बॅच आणि परमिट क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, फोटो तसेच हेल्पलाईन क्रमांक आदी माहिती समाविष्ट केली आहे. हा स्टिकर रिक्षाचालकाच्या आसनाच्या मागील बाजूला प्रवाशांना सहजपणे दिसेल, अशा पद्धतीने चिकटवण्यात येत आहे.

हेही वाचा: लाखो वाहनांच्या फिटनेसचे परिवहन विभागापुढे आव्हान

त्यामुळे रिक्षाचालकाविरोधातील कोणतीही तक्रार करायची असल्यास प्रवासी स्टिकरवर असलेल्या परवाना, बॅच आणि परमिट क्रमांकाच्या मदतीने करू शकणार आहेत.

नवघर पोलिसांनी सुमारे ५०० स्टिकर तयार केले आहेत. त्यात रिक्षामालक, चालक यांचा संपर्क क्रमांक, पत्ता, परवाना, बॅच आणि परमिट क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, फोटो तसेच हेल्पलाईन क्रमांक आदी माहिती समाविष्ट केली आहे. हा स्टिकर रिक्षाचालकाच्या आसनाच्या मागील बाजूला प्रवाशांना सहजपणे दिसेल, अशा पद्धतीने चिकटवण्यात येत आहे. त्यामुळे रिक्षाचालकाविरोधातील कोणतीही तक्रार करायची असल्यास प्रवासी स्टिकरवर असलेल्या परवाना, बॅच आणि परमिट क्रमांकाच्या मदतीने करू शकणार आहेत.

loading image
go to top