मुंबईत पुन्हा धोका वाढतोय? सलग दोन दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक

मुंबईत पुन्हा धोका वाढतोय? सलग दोन दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक

मुंबईः कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबई शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव सर्वाधिक आहे. राज्यात शनिवारी पहिल्यांदा कोरोना रुग्णांनी ३०० मृत्यूंचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. ७०० च्या खाली गेल्यानंतर, शनिवारी मुंबईतील नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरात १,०५९ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यासह मुंबईत मृतांचा आकडा ६,३९५ वर पोहोचला आहे. तर मृत्यूदर अजूनही ५.५४ टक्के आहे. 

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख १५ हजार ३४६ इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात ८३२ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८७ हजार ९०६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. ३० जुलैला ५३ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे.  मुंबईचा दुप्पट दर (डबलिंग रेट) 76 दिवस आहे. 

शनिवारी मृत्यू झालेल्यांपैकी एका रुग्णाच वय ४०  वर्षांखालील होते, ३३ मृत रुग्णांचं वय ६० वर्षांपेक्षा जास्त आणि ११ मृत्यू ४०ते ६० वर्षांदरम्यान होते. यापूर्वी ३१ जुलैला एकूण ५३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात शनिवारी एकाच दिवशी ६४ हजार ८४५ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान,  पुन्हा एकदा नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. शनिवारी दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९६०१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख ६६ हजार ८८३ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६१.८१ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४९ हजार २१४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

एमएमआर क्षेत्रात २,९९५ प्रकरणे आणि १२८ मृत्यूची नोंद झाली. रायगडमध्ये २६ मृत्यू, नवी मुंबई ३४९ आणि केडीएमसी २८३ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण प्रकरणांची संख्या वाढून ४,३१,७१९  झाली आणि मृतांचा एकूण आकडा १५,३१६ वर पोहोचला आहे.

Mumbai rise new positive COVID 19 cases count Saturday

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com