Mumbai : इंधनांचे वाढते दर नविन वर्षात तरी घटतील

राज्यातील वाहतुकदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षा
fuel
fuel Google

मुंबई : ऐन कोरोनाच्या महामारीत राज्यातील सर्वसामान्य जनता जिवनावश्यक वस्तूंच्या महागाईने होरपळत असतांना पेट्रोल,डिझेल, सीएनजीच्या वाढत्या दराचा भडका सुद्धा सहन करावा लागला आहे. गेल्या वर्षभरात मार्च ते आतापर्यंत सुमारे 16 वेळा सीएनजीच्या दरात वाढ झाली असून, सुमारे 26 रूपयाने सीएनजी वाढल्याचे चित्र आहे. त्याशिवाय गेल्यावर्षभरात पेट्रोल 9 तर डिझेल 6 रूपयाने वाढले आहे. त्यामुळे नविन वर्षात तरी इंधनाचा भडका कमी होण्याची अपेक्षा वाहतुकदारांनी केली आहे.

देशातील वाहतूकदारांचे सर्वात मोठा खर्च हा वाहनाच्या इंधनावर होते. कोविड नंतर इंधनाचे दर जागतिक पातळीवर कमी झाले, मात्र, भारतातऑइल कंपन्यांनी कुठलेही दर त्याप्रमाणात कमी केले नाही. परिणामी देशातील माल, प्रवासी वाहतूकदारांसह सर्वसामान्यांना सातत्याने वाढणारे पेट्रोल,डिझेल, सीएनजीच्या वाढत्या दरांसह, टोल प्लाजाचे दर, प्रत्येक वर्षी वाढणारा इन्शुरन्स मधील प्रीमियम, स्पेअर पार्ट जीएसटीमुळे अडचणीत सापडले आहे.

त्यामूळे नविन वर्षात तरी केंद्र सरकारने एसटीच्या कक्षेत इंधनाचे दर घेतल्यास संपूर्ण भारतात डिझेलचे दर एकूण त्याचा वाहतूकदारांना फायदा होईल अशी अपेक्षा राज्य माल व प्रवासी वाहतुक संघंटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तर आॅटोरिक्षा चालकांना नियमीत भाडेवाढी ऐवजी जुन्याच सवलतीच्या दरात सीएनजी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे मुंबई आॅटोरिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगीतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com